आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾चराठा वझरवाडी येथे शेतातील बागायतीला आग लागून सुमारे पन्नास हजाराचे नुकसान

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-१२ :- चराठा वझर वाडी येथील गंगाराम बिरोडकर व प्रकाश बिरोडकर यांच्या शेतातील बागायतीला आग लागून सुमारे पन्नास हजाराचे नुकसान झाल्यास प्राथमिक अंदाज आहे. या आगीत १० लागती माडाची झाडे,पंधरा कवाथे, गवताची गंजी १०० काजूची रोपे भस्मसात झाली आहेत.

आज सकाळी गंगाराम बिरोडकर यांचा मुलगा हेमंत बिरोडकर नेहमीप्रमाणे आपल्या शेत बागेत गेला असता, आपले अर्धे शेतबाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे लक्षात येताच त्यांनी दूरध्वनीवरून आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली, व कुटुंबियांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.

तोपर्यंत अर्धी शेत बागायती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती, यात गवताची गंजी , २५ माडाची झाडे ५० काजूची झाडे, तर प्रकाश प्रकाश बिरोडकर यांची सुमारे साठ काजूची झाडे, आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

याबाबतची माहिती तहसीलदार राजाराम मात्रे यांना देताच त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना या बाबतचा पंचनामा करण्याचे कळविले आहे.

घटनास्थळी ग्रामपंचायत सदस्य संदीप मेस्त्री यांनी धाव घेत पहाणी केली व याबाबतची माहिती ग्रामपंचायत चराठे यांना कळविली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!