◾आ. केसरकरांच्या आड मुटेपणामुळे क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडलाय ; शीतल राऊळ
◾आ.केसरकर हे फक्त सावंतवाडीचेच आमदार आहेत का? ; अक्रम खान यांचा सवाल
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-११ :- सावंतवाडी येथे जिमखाना मैदान असताना केवळ आपल्या हट्टापायी तालुका क्रीडा संकुल सावंतवाडी येथेच व्हावे या आ.दीपक केसरकर अडेलपणामुळे बांदा येथे प्रस्तावित असलेल्या क्रीडा संकुलाचे काम रखडले असल्याचा आरोप पं. स.उपसभापती शीतल राऊळ यांनी करत आ.केसरकर हे केवळ सावंतवाडी शहराचे आमदार असल्यासारखे वागत असल्याचा टोला लगावला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील तालुका क्रीडा संकुल बांदा येथील सुमारे तेरा एकर जागेत प्रस्तावित आहे.मात्र अद्याप या क्रीडा संकुलाच्या कामाच्या कोणत्याही प्रत्यक्ष कार्यवाहिला सुरुवात झाली नाही.याला आ.केसरकर जबाबदार असल्याचा आरोप बांदा भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बांद्यात आयोजित पत्रकार परिषदेत केला.
यावेळी बांदा सरपंच अक्रम खान,जिल्हा परिषद सदस्य सौ.श्वेता कोरगावर,ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर,सौ.मंगल मयेकर,सौ.किशोरी बांदेकर,माजी सरपंच श्रीमती प्रियांका नाईक,बाळा आकेरकर, केदार कणबर्गी,आबा धारगळकर, सुनील धामापुरकर, सुनील राऊळ,बाबा काणेकर आदि उपस्थित होते.
उपसभापती शीतल राऊळ म्हणाले,आ.केसरकर हे राज्यमंत्री होते.हे क्रीडा संकुल त्यांच्याच मतदार संघात होणार आहे.मात्र सर्व काही सावंतवाडीत असा हेकेखोरपणा आ.केसरकर करत आहे.तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या कार्यकाळात सावंतवाडीत सर्व सोयीनियुक्त मैदान असल्याने क्रीडा संकुलाची आवश्यकता नसल्याचा ठराव घेण्यात आला होता,याचा विसर आ.केसरकर यांना पडलाय का?असा सवाल श्री.राऊळ यांनी उपस्थित केला आहे.बांदा गावावर आपलं विशेष प्रेम असल्याचा कांगावा आ.केसरकर करतात,हेच का त्यांचे प्रेम?बांदा शहर व ग्रामीण भागासाठी होऊ घातलेल्या क्रीडा संकुलाला आडकाठी करणे याला काय म्हणावे असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
२०१८ मध्ये आपण प्रत्यक्ष केसरकर यांची भेट घेत या क्रीडा संकुलाच्या भूमीपूजनाची पहिली कुदळ आपण मारावी असेही सांगितले होते.या तालुका क्रीडा संकुलाचे श्रेय आम्हाला नकोय,पण हे क्रीडा संकुल बांद्यात व्हावे हीच इच्छा असल्याचे आपण स्पष्ट केले होते असे शीतल राऊळ यांनी सांगत भाजपचे माजी राज्यमंत्री विनोद तावडे यांनीही केसरकर यांच्याशी चर्चा करत याबाबत सूचना केली होती,मात्र केसरकर यांचा हे क्रीडा संकुल सावंतवाडीत व्हावे हा बालहट्ट असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.सावंतवाडीत तालुका क्रीडा संकुलासाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध नाही.तर बांद्यात तेरा एकर जागा हस्तांतरित होऊ शकते,या प्रस्तावावर आ.केसरकर यांची केवळ सहीची आवश्यकता आहे.परंतु केवळ आपल्या बालहट्टापायी हे क्रीडासंकुल सावंतवाडीत नेण्याचा त्यांचा कुटील डाव असल्याचा आरोप शीतल राऊळ यांनी केला आहे.
सरपंच अक्रम खान म्हणाले,गेल्या तिन्ही आमदारकीच्या निवडणुकीत बांदा भागातून आ.केसरकरांवर लोकांनी विश्वास दाखवला.मात्र केसरकरांनी स्थानिक लोकांचा हा विश्वास फोल ठरवला आहे.बांद्यात तालुका क्रीडा संकुल व्हावे यासाठी माजी सरपंच मंदार कल्याणकर,उपसभापती शीतल राऊळ,जिल्हा परिषद सदस्य सौ.श्वेता कोरगावकर यांनी पाठपुरावा केला आणि करत आहेत.मागच्या निवडणुकीपूर्वी केसरकर यांनी स्वतः या ठिकाणी येऊन जागेची पाहणीही केली होती.मग आता क्रीडा संकुल सावंतवाडीत नेण्याचा घाट का?असा सवाल श्री.खान यांनी उपस्थित केला.आ.दीपक केसरकर हे फक्त सावंतवाडीचेच आमदार आहेत का?बांदा आणि ग्रामीण भागातील विकासाचा विचार त्यांना नाही का?असे प्रश्नही सरपंच अक्रम खान यांनी विचारले.जर बांद्यात प्रस्तावित तालुका क्रीडा संकुलाला आ.केसरकर यांनी मंजुरी दिली नाही तर पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत एक वेगळ्या प्रकारचे आंदोलन भाजपतर्फे छेडले जाईल असा इशारा देत हे आंदोलन असे असेल की ज्याचा आमदार केसरकरांनी यांनी विचार केला नसेल.असे खान यांनी स्पष्ट केले.

