आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ ही वेळ राजकारणाची नाही ; एकत्रित लढण्याची ; पुंडलिक दळवी

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०८ :- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून मृत्युदर देखील वाढत आहे. त्या प्रमाणात जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा देखील अपुरी पडत आहे. कोरोनच हे संकट जागतिक असून त्याला रोखण्यासाठी प्रयत्न करण्यापलीकडे आपल्या हातात काहीच नाही आहे. मात्र, अशा परिस्थितीत केल जाणार राजकारण हे दुर्देवी आणि निषेधार्ह आहे. आजची परिस्थिती हि उणीधुणी काढण्याची नसून सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येत लढण्याची आहे. जनतेसाठी पक्षाचे झेंडे, मतभेद बाजूला सारून परिस्थितीशी झुंज देण्यासाठी प्रत्येकान पुढाकार घ्यावा. लोकप्रतिनिधीनी जेवढ शक्य होईल तेवढ सहकार्य सरकारी यंत्रणेला कराव अस आवाहन राष्ट्र्वादी कॉंग्रेस पार्टीचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी केलय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!