◾इन्सुली-माजी पंचायत समिती सभापती मानसी धुरी यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन मतदार संघात लाभार्थ्यांना कावेरी जातीच्या कोंबडीच्या पिल्लांचे वाटप..
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक
🎴बांदा, दि-०८ :- कोरोनाकाळ सुरू झाल्यापासून सामान्य तसेच गरीब शेतकरी जनतेला मोठ्या समस्यांना तोंड देत जगावं लागत आहे.अशातच काही लोकप्रतिनिधींकडुन आपापल्या परीने किंवा सरकारी निधितुन काही ना काही मदत गरीब शेतकरी जनतेला देण्यात येत आहे यापैकी एक म्हणजे सौ.मानसी धुरी या आहेत.धुरी यांनी सभापती असताना अनेक योजना आपल्या मतदारसंघात आणल्या.गतवर्षी सुद्धा पदावर नसताना जिल्हा परिषदेच्या निधितुन माजी पंचायत समिती सभापती सौ.मानसी धुरी यांच्याकडून इन्सुली मतदार संघात कावेरी जातीची कोंबडीची पिल्ले वाटप करण्यात आली.इन्सुली मतदार संघात अशाप्रकारे एकुण ६० लाभार्थींना प्रत्येकी ५० नग याप्रमाणे पिल्लांचे वाटप करण्यात आले.गेल्यावर्षी सुद्धा सभापती पदावर असताना सौ.धुरी यांच्या प्रयत्नातून अशाच प्रकारे इन्सुली मतदार संघात १०३ लाभार्थींनी याचा लाभ घेतला होता.यावेळी लाभार्थींना पक्षी वाटप करताना जिल्हा पशु अधिकारी शिंपी सर, उपसभापती राऊळ साहेब,तालुका पशुधन अधिकारी ठाकुर तसेच फणसीकर उपस्थित होते.यावेळी सर्व लाभार्थ्यांना दिलेल्या पक्षांचे पालन-पोषण कसं करावं याबद्दल अधिकारी वर्गाकडून माहिती देण्यात आली.

