◾माजी सैनिक रामचंद्र उर्फ न्हानू शंकर पवार यांचे दुःखद निधन..
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-०८ :- सावंतवाडी पुढारी वृत्तसेवा माजी सैनिक रामचंद्र उर्फ न्हानू शंकर पवार वय ८३ यांचे दीर्घ आजारानंतर नुकतेच दुःखद निधन झाले मूळ सातार्डा गावचे रामचंद्र पवार हे बेळगाव कर्नाटक येथे स्थायिक झाले होते बेळगाव येथील सैन्य छावणीत त्यांनी २० वर्षे सेवा बजावली.शिवभक्त असलेले रामचंद्र पवार यांच्या पश्चात तीन मुलगे दोन मुली सुना नातवंडे जावई असा मोठा परिवार आहे आडेली हायस्कूलचे शिक्षक संतोष पवार व वेंगुर्ला येथील सिव्हिल इंजिनियर नीलकंठ पवार यांचे ते वडील होत तर वेंगुर्ले पोलिस स्थानकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर दाभोलकर त्यांचे जावई होत.

