◾जनता कर्फ्यू सर्वसामान्य गोरगरिबांसाठी का ? मायनिंग वाल्यांसाठी का नाही?
◾मनसे तालुका उपाध्यक्ष सुधीर राऊळ यांचा सवाल..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-०७ :- सावंतवाडी तालुक्यात जनता कर्फ्यू व संचारबंदी असताना राजरोस मायनिंग जांबा दगड, काळा दगड आदी मोठ्या प्रमाणात चालू आहे जर महसूल अधिकारी सांगत आहेत हे सर्व नॅशनल लेव्हलला चालू आहे मग नॅशनल लेव्हल ला चालू असताना क्रशरवर काळा दगड खाण आदी ठिकाणी जे कामगार आहेत ते सर्व एकत्र येतात तसेच अनेक गावातून येतात ते त्याच ठिकाणी राहत नाहीत ग्रामीण भागामध्ये काहीजण भाड्याने राहतात ते त्याठिकाणी गावागावातून येतात एकमेकाच्या संपर्कात असतात त्यांना कोरोना चा संसर्ग होत नाही का त्यांना नियम का लागू होत नाही सर्वसामान्य व गोरगरीब जनता उन्हाळा येऊन ठेपला आहे बांधकाम घरे करताना सामान मिळत नाही विटा बंद आहेत सिमेंट मिळत नाही लोकांनी घरे कशी बांधायची कुठे राहायचं जनता कर्फ्यू व संचार बंदी हे गोरगरिबांना रस्त्यावर आणण्यासाठी आहे सावंतवाडी तालुक्यातून गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात अवैद्य काळा दगड नेला जातो त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात शासनाचा कोणतेही नियम ते पाळून व्यवसाय करत नाही उदाहरण बघायचं असेल तर वेत्ते, सोनुर्ली आदी भागातला जो काळा दगड आहे हा हायवेवरून न नेता ग्रामीण भागातून नेला जातो मग त्यांच्यावर कारवाई नाही ते महसूल यंत्रणेचे जावई लागतात का की उपप्रादेशिक परिवहन हे सगळे गौडबंगाल आहे काल बांदा याठिकाणी ॲम्बुलन्स साईडने जात असताना त्या ठिकाणी अचानक डंपर आला व अपघात झाला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु जर अशा प्रकारे ॲम्बुलन्स सारख्या अत्यावश्यक सेवेला रस्ता मिळत नाही ही दुर्दैवाची बाब आहे त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी या घटनेची तात्काळ दखल घेऊन जिल्ह्यात होणाऱ्या अवैद्य मायनिंग, होणारी वाहतूक यांना कडेकोट निर्बंध घालावेत जर धनदांडग्यांना वर काढण्यासाठी गोरगरीब जनतेला जनता कर्फ्यू व संचारबंदी लावत असाल तर ती गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सावंतवाडी तालुका उपाध्यक्ष श्री सुधीर राऊळ यांनी केली आहे.

