◾कॉन्ट्रॅक्टर महेश पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत पोलिस कर्मचाऱ्यांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी केले छत्र्या वाटप..
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-०६-: सावंतवाडीतील कॉन्ट्रॅक्टर महेश पाटील यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत कोरोना काळात भर उन्हात उभे राहून सेवा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना उन्हापासून संरक्षण व्हावे यासाठी छत्र्या वाटप करून अनोखी भेटवस्तू दिली आहे. त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी पी आय शशिकांत खोत, वाहतूक पोलिस प्रविण सापळे,पोलिस पांडू सावंत, पोलिस प्रसाद कंदम,सतिश कविटकर, संतोष चोडणकर, नरेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते.

