आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾माजगांव व चराठा गावांना होणारा पाणीपुरवठा ऐन उन्हाळ्याच्या दिवसात बंद ; पाण्या विना नागरिकांचे हाल..

 ◾पालिका प्रशासनाने व नगराध्यक्ष संजू परब यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी ; नागरिकांची मागणी..

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि-०६:- शहराच्या लगत असलेल्या माजगांव व चराठा गावांना होणारा पाणीपुरवठा आजपासून सावंतवाडी नगरपालिकेने बंद केला आहे.ऐन उन्हाळ्याच्या दिवसात तसेच कोरोनाच्या महामारीकाळात माजगांव व चराठा ग्रामस्थांना ह्याचा त्रास सहन करावा लागत आहे.त्याच धरतीवर आज नगरपालिकेने माजगांव मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.मात्र टँकरने पाणीपुरवठा केल्यास त्या ठिकाणी पाण्यासाठी गर्दी होते ह्यामुळे नक्कीच कोरोनाला निमंत्रित केले जाऊ शकते. जीवन प्राधिकरणाच्या ठरावानुसार पाणीपुरवठा बंद करण्यात आला सावंतवाडी शहरातील लोकांनि पाणी पुरवठा कमी दाबाने पोहोचत असल्यामुळे निर्णय घेतला आहे.परंतू त्या दोन्ही गावांना आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा निश्चित करेल असा विश्वास नगराध्यक्ष संजू परब यांनी व्यक्त केला.

दरम्यान याबाबत माजगाव ग्रामस्थ पवन सावंत यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, यापूर्वी पालिका प्रशासनाने आम्हाला कळविले होते. परंतु अचानक पाणीपुरवठा बंद करण्यात आल्यामुळे त्याचा फटका आम्हाला सहन करावा लागत आहे. जीवन प्राधिकरण खात्याकडून देण्यात आलेल्या पत्रात २००५ पासून पाणी पुरवठा बंद करण्यात येईल तोपर्यंत माजगाव येथे नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात येईल असे म्हटले होते. परंतु हा वाद कोर्टात असल्यामुळे अद्यापपर्यंत योजना काही चालू झालेली नाही. त्याचा आधार घेवून नगरपालिका प्रशासनाने आजपासून पाणी बंद केले आहे. मात्र हा निर्णय घेण्यात आल्यामुळे त्याचा फटका ग्रामस्थांना बसणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने व नगराध्यक्ष संजू परब यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!