◾प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे व खरवते मध्ये नवीन रुग्णवाहिके साठी जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करणार ; जि. प. सदस्या मिनल काणेकर
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण, दि-०६ :- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कापरे व खरवते या दोन्ही ठिकाणी नवीन रुग्ण वाहीका मिळाव्यात म्हणून आपण जिल्हा परिषद आरोग्य सभापती तसेच अध्यक्ष यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे वक्तव्य या आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष मिनल काणेकर यांनी व्यक्त केले या दोन्ही ठिकाणच्या रुग्ण वाहिका पंधरा वर्षा पेक्षा जास्त जुन्या आहेत. त्यांची वारंवार डागडुजी करावी लागते अत्यंत ग्रामीण भागातील आरोग्य केंद्र असल्याने तसेच सध्या कोविड चा प्रादुर्भाव लक्षात घेता आरोग्य केंद्रात सुस्थितीलील रुग्ण वाहिका उपलब्ध असणे काळाची गरज आहे त्या मुळे त्या लवकरात लवकर उपलब्ध व्हाव्यात या साठी आरोग्य समिती सदस्य म्हणून पूर्ण पाठपुरावा करणार असल्याचे मत सौ काणेकर यांनी व्यक्त केले.

