माझे गाव म्हणून कसाल गावात काम करणार; संतोष बांदेकर
नुतन तलाठी संतोष बांदेकर यांचा कसाल ग्रामपंचायत येथे सत्कार..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴कसाल,दि.०६: कसाल गावात काम करताना यापुढे माझे गाव म्हणून काम करणार शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असे नुतन कसाल तलाठी संतोष बांदेकर यांनी कसाल ग्रामपंचायत येथे सत्कार प्रसंगी आपले विचार व्यक्त केले.
कुडाळ तालुक्यातील गोठोस गावातून कसाल तलाठी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर कसाल ग्रामपंचायतीच्या वतीने संतोष बांदेकर यांचा कसाल सरपंच सौ. संगीत परब यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन कसाल गावातर्फे सत्कार करण्यात आला.
संतोष अनंत बांदेकर हे शासकीय अधिकारी याच बरोबर एक कलाकार देखील आहेत. चित्रपट क्षेत्रात फाॅरेन ची पाटलीन, संदूक, शाली, उदय, गाव गाता गजाली, या चित्रपटात त्यांनी काम केले आहे. तर परिवर्तन, खळवट, बाहुला, कुलस्वामिनी हे लघुपट केले आहेत. तर त्यांच्या दशावतारी कलाकारांची व्यथा मांडणारा ‘राजा’ स्वत:हून तयार केला. या लघुपटांना औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवासाठी अंतिम फेरीसाठी मानांकन प्राप्त झाले आहे. मंडळ अधिकारी ए.पी. हांगे यांनी यावेळी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी कसाल पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर, कसाल सरपंच सौ. संगीता परब, उपसरपंच दत्ताराम सावंत, ग्रामविकास अधिकारी सौ. एस.बी. कोकरे कसाल मानकरी बाळा मर्तल, कसाल मंडळ अधिकारी एस.पी. हांगे, चिराग बांदेकर, पत्रकार सुनील आचरेकर, भालचंद्र बागवे आदी सह ग्रामपंचायत कर्मचारी, कसाल महसूल कार्यालयातील कर्मचारी आदी उपस्थित होते.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
*🔥घरच्या जेवणासह नाश्त्याची चव आता सावंतवाडीत तीही खिशाला परवडणारी…🔥*
*_💥 आरोलकर खानावळ 💥_*
_शाकाहारी,मांसाहारी जेवण फक्त पार्सल सुविधा उपलब्ध…🛍️_
*🌈नाश्ता २० रुपये पासून!💰*
_घावणे चटणी,घावणे उसळ,शिरा,उपमा,पोहे,मिसळपाव,भजी,वडा,इडली,स्पेशल मेदूवडा,ब्रेड पकोडा…._
*🤷🏻♀️बुधवार,शुक्रवार,शनिवार,रविवार🤷🏻♂️*
😍 😝 _चिकन पाव_ 😝😍
*💂🏻♀️अस्सल मालवणी चुलीवरचे जेवण!*
_💫शाकाहारी जेवण ७० रुपये.._
_💫मांसाहारी जेवण ११० रुपये.._
_💫डबा घरपोच मिळेल.._
_💫पार्टी ऑर्डर्स स्विकारल्या जातील.._
_💫रोजच्या डब्याची ऑर्डर स्विकारली जाईल.._
*🔮संपर्क : महेश आरोलकर*
_तोरणे पाणंद, सबनिसवाडा,_
_सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग._
*_📱मोबाईल : 9867245572_*
*_7400237572_*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

