◾आमदार शेखर निकमांनी पत्रकार विमा व आर्थिक सहाय्य मिळण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांकडे केली मागणी..
🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण, दि-०४ :- कोरोना महामारीच्या काळात जीवाची पर्वा न करता वृत्तांकन करणारे पत्रकार विमा सरंक्षण शिवाय काम आपले कर्तव्य बजावत आहेत . विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकारांना या काळात पुरेसा पगार मिळत नसल्याने त्यांचीही फरफट होत असते परंतु ते या स्थितीतही या काळातही लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम प्रामाणिकपणे करत आहेत.तरी या साऱ्या पार्श्वभूमीवर सरसकट सर्व पत्रकारांना विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
कोरोनाची लागण झाल्याने काही पत्रकारांना जीवही गमवावा लागला आहे . परंतु या कालावधीत जीवाची पर्वा न करता वृत्तांकन करुन आपले कर्तव्य बजावणाया पत्रकारांना शासनाकडून अद्यापही कोणतेही आर्थिक सहाय्य मिळालेले नाही.त्यामुळे कोरोना बाधित पत्रकारांच्या कुटूंबांची आर्थिक अडचण फारच कठीण झाल्याचे दिसून येते . या बाबीचा विचार होऊन काही महिन्यांपूर्वी सद्याच्या सरकारकडून पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पत्रकारांना शासनाकडून विमा सरंक्षण मिळावे यासंदर्भात सकारात्मक विचार होऊन १५ लाखाचे विमा कवच जाहिर करण्यात आले होते . परंतु कॅबिनेट निर्णय न झाल्याने सदर विषय प्रलंबित आहे . तरी शासन स्तरावर या विषयी सकारात्मक विचार होऊन कोरोना काळावधीत राज्यातील सर्वच पत्रकारांना जर दुर्देवाने संसर्ग झाला तर त्यांच्या उपचारासाठी भरीव आर्थिक निधी व दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्या पश्चात कुटूंबीयांना मदत निधी लवकरात लवकर शासनाकडून जाहीर करण्यात यावा अशी मागणी निकम यांनी केली आहे.

