आणखीकोकणदोडामार्गमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾दोडामार्ग मध्ये होणार फुल लॉकडाऊन..

 

◾तहसीलदार कार्यालयामध्ये मध्ये बैठक झाली संपन्न ; उद्या व परवा दोन दिवस बाजारपेठ राहणार सुरू..

🖥️ कोकण लाईव्ह बेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-०४ :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता प्रशासन कडक पावले उचलताना दिसून येत आहे. सावंतवाडी तालुक्याबरोर आज दोडामार्ग तालुक्यात कडक लॉकडाऊन व्हायला पाहीजे यासाठी आज दोडामार्ग तहसीलदार येथे बैठक संपन्न झाली.त्याचबरोबर ७ मे ते १५ मे या कालावधीत संपूर्ण लॉकडाऊन होवून तालुक्यातील इतर गावातील बाजारपेठा तसेच दुकाने बंद राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच त्यासंदर्भात इतर गावातील व्यापाऱ्यांची उद्या बैठक घेतली जाईल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी दोडामार्ग तहसीलदार अरुण खानोलकर, पोलीस निरीक्षक महेंद्र घाग,मुख्याधिकारी शिवराज गायकवाडकर,तालुका वैद्यकीय अधिकारी रमेश करतस्कर,ज्ञानेश्वर एवाळे,यांसह व्यापारी अध्यक्ष लवु मिरकर,पं.स.सदस्य बाबुराव धुरी, सागर शिरसाट, प्रशांत केसरकर,माजी नगराध्यक्ष संतोष नानचे,मोहन गावडे यांसह आदी व्यापारी उपस्थित होते.

याबाबत अधिकृत नियमावली उद्या जाहीर होणार असून त्यावरुनच लॉकडाऊनची तीव्रता लक्षात येणार आहे.तसेच सीमाबंदीवर कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता असुन गोव्यात कामानिमित्त ये-जा करणाऱ्या लोकांना थोडीफार कळ सोसावी लागणार असल्याचे या बैठकीतील एकुण चर्चेवरुन दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!