◾कोरोना रोखण्यासाठी निगुडे वासियांनी सहकार्य करावे..
◾ग्रामपंचायत प्रशासनाचे आवाहन ; आवश्यक दक्षता घ्या
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि-०३:- निगुडे गावातील नागरिकांनी कोरोना महामारी रोखण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे गावातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे आसपासच्या पंचक्रोशी मध्ये कोरोना चे अधिकाधिक रुग्ण वाढत आहेत मुंबई व इतर बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीने व त्यांच्या संपर्कातील व्यक्तीने कोरना टेस्ट करणे बंधनकारक राहील प्रत्येकाने आपली काळजी स्वतः घ्यायची आहे यासाठी निगुडे ग्रामपंचायतीने ठिकाणी होर्डिंग लावलेले आहेत व नागरिकांना आवाहन करण्यात आले तसेच कोरोना बाधित रुग्ण आढळले त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन केलेला आहे निगुडे सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे तसेच ग्रामस्तरीय सनियंत्रण समिती यांनी योग्य त्या उपाययोजना करत नागरिकांची काळजी घेऊन कोरोना हद्दपार करण्याचे ठरविले आहे त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.

