आणखीकोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾पाडलोस ग्रामपंचायत सदस्या लीना माधव यांचा राजीनामा..

 

◾कोरोना काळात दुर्लक्ष केल्याचे म्हणणे..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴बांदा,ता.०३:- काही दिवसांपूर्वी आपल्या संपूर्ण कुटुंबाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. पाडलोस ग्रामपंचायतकडून माझ्या कुटूंबाला सामाजिक स्तरावर आणि मानसिक आधार देणे गरजेचे होते. परंतु कुठल्याही प्रकारची मदत झाली नाही. स्वतः ग्रामपंचायत सदस्य असूनसुद्धा माझी कोणीही दखल न घेतल्यामुळे सामान्य नागरिकांना आम्ही तरी काय मदत करणार असा प्रश्न मला वारंवार सतावत होता. त्यामुळे व्यथित होऊन मी माझ्या ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा पाडलोस सरपंच अक्षरा पाडलोसकर यांच्याकडे दिल्याचे ग्रामपंचायत सदस्या लीना माधव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

श्रीमती माधव म्हणाल्या की, कोरोना बाधित रुग्ण योग्य उपचारानंतर व्यवस्थित पूर्णपणे बरा होतो. आम्ही आरोग्य विभागाच्या नियमांचे क्वारंटाइन कालावधीत काटेकोरपणे पालन केले. आज आम्ही कोरोना मुक्त झालो असलो तरी देखील समाज आमच्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत आहे. कोरोना काळात आमच्या कुटुंबाचे जीवनावश्यक वस्तूंसाठी खूप हाल झालेत. जनावरांसह दैनंदिन जीवनात वापरासाठी पुरेसे पाणी देखिल मिळणे कठीण झाल्याचा अनुभव आम्हाला आला. त्यामुळे गावात कोणत्याही व्यक्तीस कोरोना झाल्यास आणि त्याला जीवनावश्यक वस्तूंची गरज भासल्यास आपल्या परीने सर्वतोपरी मदत करणार असल्याचे सौ. माधव यांनी पत्रकात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!