आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

◼️दिवंगत प्रमोद महाजन यांना स्मृतीदिनी माजी आमदार बाळ माने यांनी केले अभिवादन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-०३ :- भारतीय राजकारणातील कुशल आणि जादुई व्यक्तिमत्त्वाचे दिवंगत प्रमोद महाजन हे महत्त्वाकांक्षी आणि जागतिक विचाराचे नेते होते. त्यांचे विचार आणि कार्य चिरंतन काळापर्यंत सर्वांच्या मनात कायम राहिले असून या त्यांची प्राणज्योत ३ मे १९०६ रोजी मालवली. या भारतीय जनता पक्षाच्या राजकारणातील तपस्वी नेत्याला त्यांच्या स्मृतीदिनी मी विनम्र अभिवादन करतो अशा शब्दांत माजी आमदार बाळ माने यांनी दिवंगत प्रमोद महाजन यांना सोमवारी आदरांजली वाहिली.

प्रमोद व्यंकटेश महाजन (ऑक्टोबर ३, इ.स. १९४९ – मे ३, इ.स. २००६) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. मराठवाड्यासारख्या मागास भागात जन्मलेले प्रमोद महाजन हे महत्त्वाकांक्षी व आधुनिक जागतिक विचाराचे राजकारणी नेते होते. पत्रकार, शिक्षक ते राष्ट्रीय राजकारण अशा पायर्‍या चढत गेलेल्या महाजनांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात १९९५मध्ये प्रथमच बिगर कॉंग्रेसी सरकार स्थापन झाले. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मैत्रीमुळे सेना-भाजप युती त्यांनी घडविली. ते एक कुशल, मुत्सद्दी राजकारणी होते. देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपचे ते पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एक होते. महाजन हे भारतीय जनता पक्षातील दुसर्‍या पिढीतील मोठे नेते होते.

आणीबाणीच्या काळात प्रमोद महाजन सक्रिय राजकारणात उतरले.प्रमोद हे व्यंकटेश देवीदास महाजन आणि प्रभादेवी यांचे द्वितीय चिरंजीव होते. त्यांचा जन्म मेहबूबनगर ( तत्कालीन अखंड आंध्रप्रदेशात आता तेलंगणात असलेले शहर) येथे झाला. महाजन कुटुंब त्यांच्या महाजन गल्ली उस्मानाबाद येथून अंबाजोगाईला मंगळवार पेठेत भाड्याच्या घरात स्थलांतरित झाले. त्यांचे बालपण अंबाजोगाईत गेले. प्रकाश आणि प्रवीण ही त्यांच्या भावाची आणि प्रतिभा आणि प्रज्ञा ही त्यांच्या बहिणींची नावे आहेत. ते २१ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांचे शिक्षण योगेश्वरी विद्यालय आणि महाविद्यालय आणि रानडे पत्रकारिता या संस्थांत झाले. त्यांनी भौतिकशास्त्र आणि पत्रकारितेमध्ये पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.

नाटकांच्या सामायिक आवडीमुळे परिचय झालेल्या रेखा हमीने यांच्याशी ११ मार्च, इ.स. १९७२ रोजी त्यांचे लग्न झाले. त्यांना पूनम ही मुलगी आणि राहुल हा मुलगा आहेत. दोघेही प्रशि़क्षित विमानचालक आहेत. त्यांच्या मुलीचे आनंद राव वजेंदला या हैदराबाद येथील उद्योगपतीशी लग्न झाले. त्यांनी खोलेश्वर महाविद्यालयात इंग्रजीच्या अध्यापनाचे काम इ.स. १९७१ पासून १९७४ पर्यंत केले. महाजन यांनी इ.स. १९९६ मधील १३ दिवसांच्या वाजपेयी शासनामध्ये संरक्षणमंत्रिपद सांभाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!