आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसिंधुदुर्ग

◾अरुळेचे माजी सरपंच प्रकाश वासुदेव रावराणे यांचे दीर्घ आजाराने निधन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

 ✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-०२ :- अरुळेचे माजी सरपंच प्रकाश वासुदेव रावराणे वय ७० वर्षे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. अरुळे ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या ज्योती रावराणे यांचे ते पती होत.

अरुळे गावचे ग्रामदैवत श्री बोर्चादेवी देवस्थानचे ते प्रमुख मानकरी होते. समाजीक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग होता. सर्वांशी मिळून मिसळून वागणे असा त्यांचा स्वभाव होता. त्यांना बाळूराव या टोपण नावाने ओळखले जात होते. सन २०१२ ते २०१७ या दरम्यान त्यांनी सरपंच म्हणून उत्कृष्ट काम केले होते.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगी,मुलगा,भाऊ, भावजय असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!