आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾सावंतवाडी तालुक्यात आज सापडले तब्बल ४५ कोरोना बाधित रुग्ण..

 

◾आतापर्यंत ७० जणांचा कोरोना मुळे मृत्यू

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

प्रतिनीधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-०१ :- सावंतवाडी तालुक्यात आज तब्बल ४५कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत, त्यात शहरात २१ तर ग्रामीण भागात २४ रुग्णांचा समावेश आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी शिरोडकर यांनी दिली.

सावंतवाडी शहरातील जुना बाजार चार, सर्वोदय नगर एक, बाहेरचा वाडा तीन,खासकिलवाडा चार,सावंतवाडी बाजारपेठ,नऊ असे एकूण २१ तर ग्रामीण भागातील मळेवाड चार ,कोंडुरा दोन,कुणकेरी एक, देवसू दोन,मळगाव एक, कोलगाव चार, चराठा एक, आरोंदा तीन, तिरोडा एक ,तळववडे एक, बांदा एक, आंबेगाव एक, अशा रुग्णांचा समावेश आहे.

सावंतवाडी तालुक्यात आतापर्यंत एकूण ७० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे, तालुक्यातील २७४ कोरोना बाधीत रुग्ण ज्ञसध्या उपचार घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!