◾आपला जीव धोक्यात घालून धान्य वाटप करणाऱ्या रास्त धान्य दुकानदारांना विमा कवच मिळत नाही तोपर्यंत धान्य वाटप बंद..
◾१ मे पासून राज्यातील सर्व रास्त धान्य दुकानावर धान्य वाटप बंद ; धान्य वाटप संघटनेचा निर्णय..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि.२९-: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असतानादेखील राज्यात भूकबळी होऊ नये. यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता धान्य वाटप केले परंतु त्यांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे विमा कवच देण्यात आले नाही. यावेळी मृत झालेल्या रास्त धान्य दुकानदारांना देखील कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देखील देण्यात आली नाही आहे.
त्यामुळेच नाईलाजास्तव १ मे पासून राज्यातील सर्व रास्त धान्य दुकानावर धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. त्यामुळे जो पर्यंत शासनाकडून योग्य निर्णय होत नाही तो पर्यंत धान्याचे मागणी पत्र मंजूर करू नये अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार म्हात्रे यांच्याकडे केली आहे.
यावेळी संजय मळीक, तनवी परब, लक्षमण ठाकूर, भाककर सावंत, प्रविण गवस, शिवा लाड, रोहिनी गावडे , अनिकेत रेडकर, संतोष देऊगुरो निवेदन देताना उपस्थित होते.

