◾सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लसींचा तुटवडा व ऑनलाईन रजिस्ट्रेशन ला येणाऱ्या अडचणीसंदर्भात नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी डॉ. उत्तम पाटील यांच्याशी केली चर्चा..

🖥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि.२८-: आज सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात लसींचा तुटवडा व ऑनलाईन रजिस्ट्रेशन ला येणाऱ्या अडचणीसंदर्भात सावंतवाडी भाजपा तर्फे नगराध्यक्ष संजू परब यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी डॉ. उत्तम पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.

यावेळी डॉ पाटील यांनी सांगितले की, लस उपलब्ध झाल्यानंतर दरदिवशी सकाळी ९ ते दुपारी १.३० वाजेपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना तर दुपारी ३ ते ५ यावेळेत कोरोना वॉरीयर्स यांना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पहिल्या डोससाठी रजिस्ट्रेशन आवश्यक असून दुसऱ्या डोससाठी रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसल्याचेही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात सावंतवाडी शहरातील लोकांना प्राधान्य देणार असल्याचेही डॉ. पाटील यांनी सांगितले आहे.

यावेळी ऑनलाईन रजिस्ट्रेशनला फक्त मळेवाड पिएचसी व आंबोली पिएचसी ही दोनच केंद्र दाखवत असल्याचे अजय गोंदावळे व सुधीर आडिवरेकर यांनी निदर्शनास आणून दिले असता डॉ. पाटील म्हणाले की जिथे लस उपलब्ध आहेत तेच केंद्र दाखवले जात आहे. तसेच दुसरा डोस घेतेवेळी आधारकार्ड व रजिस्टर मोबाईल नंबर सांगणे आवश्यक असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली आहे.

यावेळी डॉ. पाटील यांनी सांगितले की, सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी भोसले पॉलिटेक्नीक येथे १०० बेड आहेत त्यापैकी ६४ बेड शिल्लक आहेत तर गंभीर रुग्णांसाठी समर्पीत कोव्हिड सेंटर, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय येथे बेड शिल्लक आहेत.

यावेळी सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, केतन आजगांवकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!