◾खेर्डी औद्योगिक वसाहतीत कोविड केअर सेंटर उभारावे ; रुपेश आवले
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-२६ :- शहरालगत असलेल्या खेर्डी गावात तालुक्यातील पहिली औद्योगिक वसाहत आहे . या वसाहतीत आता अनेकप्लॉट खाली असूनअनेक कंपन्याही बंद झाल्या आहेत . तरी या ठिकाणी शासनाने कोविड केअर सेंटर सुर करावे अशी मागणी काँग्रेसचे चिपळूण तालुका उपाध्यक्ष रुपेश आवले यांनी केली आहे .
सध्या चिपळूण तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात होत आहे . वाढत्या रुग्णांमुळे बेड्सचा प्रश्न निर्माण झाला आहे . खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार करणे सर्वसाधारण रुग्णांना परवडणारे नाही . तरी शासनाने खेर्डी औद्योगिक वसाहतीतील रिकामे प्लॉट ताब्यातघेऊन जर तेथे कोविड सेंटर उभे केले तर तालुक्यातील कोविड रुग्णांना त्याचा लाभ होईल . याचा गांभिर्याने विचार व्हावा अशी मागणीही युवक उपाध्यक्ष रूपेश आवले यांनी केली आहे

