◾शिक्षक मित्र,सामाजिक प्रतिष्ठान,सावर्डे या सामाजिक संस्थेचे काम कौतुकास्पद ; आमदार शेखर निकम
◾संस्थेच्या माध्यमातून कोविड रूग्णांना दररोज दिला जातो पोषक आहार..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-२६ :- सावर्डे आणि सावर्डे पंचक्रोशीत कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.याच पार्श्वभूमीवर सह्याद्री संकुलातील मागासवर्गीय वसतिगृहात आमदार शेखरजी निकम यांच्या प्रयत्नातून सुरु केलेल्या कोविड सेंटरमधील रूग्णांसाठी मदत करण्याचे नुकतेच स्वतः आवाहन केले होते. त्याची दखल घेऊन
एक हात मदतीचा’ या उपक्रमांर्गत शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान,सावर्डे या सामाजिक संस्थेने कोविड सेंटरमध्ये आयसोलेट असणा-या रूग्णांसाठी पुरक आहार म्हणून अंडी वाटप सुरू करून रूग्णसेवेत सहभाग घेतला आहे.त्याचबरोबर प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आपल्या परिचयातील दानशूर व्यक्तींना देखील मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करीत आहेत.शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठानच्या या कार्याची दाखल आमदार शेखर निकम यांनी घेतली असून दानशूर व्यक्तीनी या कामी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. तर स्वतः आमदार शेखर निकम यांनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश सावर्डेकर आणि सर्व पदाधिकारी यांचे तसेच या सामाजिक कामाचे कौतुक केले आहे. “शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने या आधीदेखील अनेक सामाजिक कार्यात आपले महत्वपूर्ण योगदान दिले असून अल्पावधीत या संस्थेने अनेक समाजोपयोगी उपक्रमातून आपले समाजिक भान जपले आहे.

