आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾जिल्ह्यात आज २९३ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह..

 

◾सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ८८४ रुग्णांवर उपचार सुरू ; आज कोरोनामुळे जिल्ह्यात सहा व्यक्तींचा मृत्यू..

◾प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली माहिती..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्गनगरी,दि-२४ :- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ८ हजार ३४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २ हजार ८८४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान आज कोरोनामुळे सहा व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.तर जिल्ह्यात आज आणखी २९३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

मृतांमध्ये जामसंडे-देवगड येथील ६५ वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कांबळेगल्ली-कणकवली येथील ६५ वर्षीय पुरुष आहे. त्याला मधुमेह, उच्चरक्तदाबाचा त्रास होता. कुंब्रल-दोडामार्ग येथील ५८ वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाब,मधुमेहाचा त्रास होता. देवली-मालवण येथील ७० वर्षीय महिला आहे. तिला उच्चरक्तदाब,मधुमेहाचा त्रास होत. नावळे-वैभववाडी येथील ५० वर्षीय पुरुष आहे. त्याला उच्चरक्तदाब,मधुमेहाचा त्रास होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!