◾वैभववाडीतिल कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करणार डॉक्टर फ्रँटर्निटी क्लब सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे
◾हक्काचा व ओळखीचा डॉक्टर सेंटरमध्ये मिळाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर निश्चितच आनंद पहावयास मिळेल..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी,दि-२३ :- कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर फ्रँटर्निटी क्लब सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र पाताडे हे पुढे सरसावले आहेत. वैभववाडीतील कोवीड केअर सेंटर (सीसीसी) मधील रुग्णांवर उपचार व मार्गदर्शन डॉ. पाताडे करणार आहेत. हक्काचा व ओळखीचा डॉक्टर सेंटरमध्ये मिळाल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर निश्चितच आनंद पहावयास मिळणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून रुग्णांना ही संधी उपलब्ध झाली आहे. आ. नितेश राणे यांनी टाकलेला शब्द प्रमाण मानत डॉ. राजेंद्र पाताडे यांनी कोवीड केअर सेंटर म्हणजेच सीसीसी मध्ये रुग्णसेवेची जबाबदारी उचलली आहे. वैभववाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार यांनी तालुक्यातील सांगुळवाडी सीसीसी ला डॉ. राजेंद्र पाताडे व डॉ. मंदार पाटोळे हे काम पाहणार असल्याचे सांगितले आहे.

