◾विंधणे पंचक्रोशी उरण रायगड येथील माऊली वारकरी मंडळाने कोरोना रुग्णांसाठी केली मदत..
◾कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी फिरणाऱ्या वाहनाचे भाडे केले अदा..
◾प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी माऊली वारकरी मंडळाचे मानले आभार..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि-२२ :- विंधणे पंचक्रोशी उरण रायगड येथील माऊली वारकरी मंडळाने सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या विनंतीवरून कोवीड विषाणू बाधीत रुग्णांची देखभाल अधिक जलद गतीने व्हावी यासाठी खासगी वाहनाच्या भाड्याची रक्कम ७५०००/-रुपये जमा करुन कोरोना बाधीत रुग्णांना मदत केली आहे.
यापूर्वीही या मंडळाने धान्य वाटप केले होते मात्र त्याचा कुठेही गाजावाजा केला नव्हता.आताही या माऊली वारकरी संप्रदाय मंडळाने अशा प्रकारची मदत करून खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविले आहे .त्याबद्दल तहसीलदार राजाराम म्हात्रे व या वारकरी मंडळाचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी आभार मानले आहेत.

