आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्यांनी पंधरा दिवसांनी रॅपिड टेस्ट करा ; जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत

 

◾जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,दि-२१ :- गोव्यात नोकरीसाठी जाणाऱ्या युवक -युवती दर पंधरा दिवसांनी रॅपिड टेस्ट करण्यात यावी रोज टेस्ट न करता त्यांचे फक्त तापमान तपासण्यात यावे अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आज येथे आरोग्य विभागाला दिल्या आहेत. जिल्ह्यातून एकूण सुमारे १४ हजार तरूण -तरुणी गोव्यात नोकरीसाठी जात आहेत,असे प्रशासनाचे म्हणणे आहे.आज सौ सावंत यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली व अधिकारी व प्रशासनाशी चर्चा केली.या वेळी त्यांना या सूचना दिल्या .कोरोनाच्या वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत येथील लसीकरणाचा आढावा घेतला.यावेळी होम आयसोलेशन असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी औषध साठ्याची माहिती घेतली.बांदा आरोग्य केंद्रात सर्वाधिक ओपिडी असल्याने अतिरिक्त कर्मचारी देण्याचे आश्वासन सावंत यांनी दिले.यावेळी समाज कल्याण सभापती अंकुश जाधव,शिक्षण व आरोग्य सभापती शर्वणी गावकर,सभापती निकिता सावंत,जिल्हापरिषद सदस्य श्वेता कोरगावकर,उपसभापती शीतल राऊळ,बांदा सरपंच अक्रम खान,गटविकास अधिकारी व व्ही एन नाईक,बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण,तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.जगदीश पाटील,डॉ.मयुरेश पटवर्धन ,ग्रामपंचायत सदस्य श्यामसुंदर मांजरेकर,मकरंद तोरसकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!