आणखीकोकणशासकीयसिंधुदुर्ग

सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी राहतील…

◾सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता हा निर्णय घेतला आहे – के. मंजुलक्ष्मी

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴सिंधुदुर्ग : दि. २० जिल्ह्यात कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत.

सर्व किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, कन्फेक्शिनरी, सर्व खाद्य पदार्थाचे दुकाने (चिकन, मटण, कोंबडी, मासे आणि अंडी ), कृषी अवजारे व शेतमालाशी संबंधित सेवा, पशुखाद्य विक्री सेवा, पावसाळी हंगामासाठी व्यक्तींसाठी, तसेच संस्थांसाठी साहित्य विक्री करणारी दुकाने ही सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच चालु ठेवता येतील.

तथापी या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत घरपोच सेवा देता येईल, असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!