आणखीआपत्कालीनकोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

फादर फिलीप डिसोजा यांचे दीर्घ आजाराने निधन 

🖥️ Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : राहुल गायकवाड

🎴सावंतवाडी : दि. २० सिंधुदुर्ग जिल्ह्याचे हसतमुख, शांत आणि संयमी प्रेमळ फादर म्हणून ओळखले जाणारे फादर फिलीप डिसोजा यांचे दिर्घ आजाराने मंगळवारी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांनी आपल्या फादर या कारकिर्दीत सिंधुदुर्ग डायसिसमधील अनेक चर्चमध्ये आपली याज्ञिकी सेवा बजावत येशू ख्रिस्ताची शिकवण दिली होती.

फा.डिसोजा हे उत्तम प्रवचनकार होते. गेल्या अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. आज अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी नवसरणी केंद्र सावंतवाडी येथे दुपारी १२.३० नंतर ठेवण्यात येणार असून आज सायंकाळी ४.३० वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. कोरोनाची परिस्थिती पाहता त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांच्या परिवारातील सदस्य आणि मोजक्याच फादर, सिस्टर्स यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शिवाय डायसिसच्या YOUTUBE चॅनलवर त्यांचे अंतिम दर्शन घेता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!