◾बांदा – दोडामार्ग रस्त्याची दयनीय अवस्था कायम..
◾रस्ता मंजुर होवुन काळ लोटला तरी दुरुस्तीचे नाव नाही..
◾आधी जिओ नतंर जिवन प्राधिकरणाने रस्ता उखडवला..
◾बांधकाम विभाग नक्की कोणासाठी काम करत आहे ; जिओ, जिवन प्राधिकरणवाल्यांसाठी की जनतेसाठी ; सामान्य जनतेला पडला प्रश्न
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴बांदा,दि-१८ :- बांदा – दोडामार्ग ह्या रस्त्यांची नुसती चाळण झालेली आहे.नागरिक वाहनचालक तसेच मार्गावरुन ये-जा करणारे प्रवासी या रस्त्याला अक्षरशः कंटाळलेेले आहेत.प्रशासकिय यंत्रणा मात्र याकडे हेतु पुरस्सर डोळेझाक करताना दिसत आहे.किती तरी आंदोलने उपोषणे झाली निवेदने दिली गेली परंतु हाती लागली केवळ आणि केवळ पोकळ आश्वासने.
आश्वासना पलिकडे ना काही मिळाले ना काही साध्य झाले जणु काही बांधकाम विभागाला काही पडलेले नाही अशा अर्विवभावात हा विभाग काम करत आहे.
सुरूवातीला जिओ कंपनीने रस्त्याची साईट पट्टी खोदली व नंतर आता जिवन प्राधिकरणवाले रस्ता खोदताहेत. मात्र यात सामान्य जनतेला खड्ड्यांतून प्रवास करावा लागत आहे. बांधकाम विभागाला या रस्त्याचे व सामान्य जनता प्रवास करत असलेल्या खड्ड्यांचे काहीही पडलेले नाही.
त्यामुळे बांधकाम विभागातले अधिकारी वर्ग नक्की कोणासाठी काम करताहेत असे प्रश्न सामान्य जनते मधून केले जात आहेत.

