◾आमदार शेखर निकमांच्या प्रयत्नाने सावर्डेत कोविड सेंटर सुरू..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

 🎴चिपळूण,दि-१८ :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बेडची असलेली कमतरता हे सगळे बघता आमदार शेखर निकम यांच्या विनंतीनुसार व मार्गदर्शनाखाली सावर्डे डॉक्टर्स असोसियेशन व श्री हॉस्पिटल यांच्या सौजन्याने DCHC कोव्हीड केयर सेंटर सावर्डे या ठिकाणी सुरू करण्यात आले.

यावेळी चिपळूण संगमेश्वर विधानसभेचे आमदार शेखर निकम,तहसीलदार जयराज सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी सौ ज्योती यादव, पंचायत समिती सदस्य नितीन ठसाळे, माजी सरपंच खेर्डी दशरथ दाभोळकर,राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस राकेश चाळके, सावर्डे सरपंच सौ समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी ,माजी सरपंच बाळू मोहिरे, माजी उपसरपंच शरद चव्हाण ,संदीप खेराडे, सतीश सावर्डेकर, सचिन बागवे तसेच डॉक्टर असोसिएशनचे डॉ किसन पाटील, डॉ प्रफुल्ल माने, डॉ अमोल निकम , डॉ निलेश पाटील, डॉ अरुण पाटील, डॉ समीद चिकटे, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!