आणखीआरोग्यकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

◾शासन दरापेक्षा अधिक च्या दरावर राहणार नियंत्रण..

 

◾खाजगी रुग्णालयातील कोव्हिड बील तपासणी साठी समिती कार्यान्वित..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्गनगरी,दि-१८ :- वाढत्या कोरणा चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील खाजगी रुग्णालय ही पेड कोव्हिड हॉस्पिटल म्हणून चालवण्याची जिल्हा शल्यचिकित्सक यांनी परवानगी दिलेली आहे. सदर रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारता येणार नाही असे आदेश शासनाने दिले आहेत अनुषंगाने जिल्ह्यातील रुग्णालयांकडून covid-19 बाधित रुग्णांकडून उपचारा पोटी आकारण्यात येणाऱ्या बिलाची तपासणी व महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत करण्यात येणारे उपचार या योजनेचा लाभ इत्यादी बाबींची तपासणी करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती व तालुका स्तरावर समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तालुकास्तरावरील समन्वय अधिकारी पुढील प्रमाणे निवासी नायब तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी व सहाय्यक लेखा अधिकारी, पंचायत समिती हे अधिकारी खाजगी हॉस्पिटल व्यवस्थापन संबंधी समन्वय अधिकारी म्हणून काम पाहतील. बिल तपासणी अधिकारी हे रुग्णालयात मार्फत देण्यात येणाऱ्याबिलाची तपासणी करून सदर बिल अदा करण्याबाबत शिफारस देतील तसेच सदर ते बिल विहित दराप्रमाणे असल्याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी शिफारस घ्यावयाचे आहे .तर रुग्णालय व्यवस्थापन ने दिलेल्या बिलावर संबंधित रुग्णांचा आक्षेप असल्यास त्याबाबत जिल्हास्तरीय समिती यांनी चौकशी करून आपला निर्णय घ्यायचा आहे जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये रोजगार हमी योजना उप अधिकारी प्रशांत पानवेलकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश खलीपे सदस्य सचिव व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय नांदेरेकर सदस्य जिल्हाधिकारी कार्यालय लेखा अधिकारी नितीन सावंत सदस्य अशी समिती कार्यान्वित करण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!