◾कुडाळ शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची करण्यात आली कोरोना टेस्ट..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : विश्राम वारंग
🎴कुडाळ ,दि.१७ :- कुडाळ शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची आज कोरोना टेस्ट करण्यात आली. संत राऊळ महाराज महाविद्यालय चौकामध्ये पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने आरोग्य विभागामार्फत ही टेस्ट करण्यात आली. या कारवाईने अचानक रस्त्यावरची गर्दी मात्र कमी झाली.
कुडाळ शहरांमध्ये विनाकारण नागरिक मोठ्या प्रमाणावर अत्यावश्यक सुविधांच्या नावाखाली फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले त्यामुळे याबाबत कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली . महसूल विभाग आणि पोलीस यंत्रणेसह नगरपंचायतीच्या प्रशासनाची संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीमध्ये विनाकारण शहरांमध्ये फिरणाऱ्या नागरिकांची चौकशी करून त्यांची कोरोना तपासणी तात्काळ करावी असे ठरले, त्याप्रमाणे आज (शनिवारी) संत राऊळ महाराज महाविद्यालय चौकामध्ये पोलीस निरीक्षक शंकर कोरे, कदम, उपनिरीक्षक शिंदे, डिसोझा, वहातुक पोलीस कर्मचारी वारंग, सरमळकर, पाटील, भगत, नगरपंचायतीचे कर्मचारी अनिश सावंत, राकेश केसरकर, गोट्या कोरगावकर, आरोग्य विभाग सिध्दार्थ बावकर आदी उपस्थित होते. विनाकारण फिरणाऱ्या ६० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान विनाकारण फिरणाऱ्यांची अचानक कोरोना टेस्ट सुरु झाल्यावर अचानक रस्त्यावरची गर्दी मात्र कमी झाली. या कारवाईने विनाकारण फिरणाऱ्यानी मात्र कारवाईची धास्ती घेतली आहे.

