आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

कोकण लाईव्ह न्युजचा इफेक्ट …

◾…. यामुळेच आहेत नागरिक आणि वाटसरू समाधानी

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. १७ जाणवली पुलाजवळ बॅरिकेड नसल्यामुळे अपघाताचं प्रमाण खुप मोठ्या प्रमाणात वाढलं होत. कोकण लाईव्हने न्युज केल्यानंतर दिलीप बिल्डकॉम् म्हणा किंवा प्रशासन म्हणा यांना जाग आली आणि जाणवली पुलाजवळ बॅरिकेड लावण्यात आले आहेत.

यामुळे आता कोणीही कुठुनही गाडी ने – आण करू शकणार नाही, सगळ्यांना फिरूनच जावं लागत आहे. या सगळ्या गोष्टीमुळे अपघाताचे प्रमाण खुप कमी झालेले दिसून येत आहे.

त्यामुळे येथील नागरिक आणि वाटसरू खुप समाधानी असल्याचे दिसुन आले.

नागरिकांचं अजुन एक म्हणणं आहे की, येथे सिग्नल खांब उभे करावेत किंवा अंतर्वक्र – बहिर्वक्र आरसे बसवावेत. यामुळे अजुन थोड्या प्रमाणात का होईना, अपघात कमी होतील. गाडी घेऊन जाणारे व पायी चालत जाणाऱ्यांसाठी ते खुप सोयीचे होईल. असं देखील म्हणणं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!