◾अखेर बहुप्रतिक्षित वाणीआळी रस्त्याचे काम मार्गी लागल्याने नागरिकांतून समाधान..
◾महाविकास आघाडीतील नगरसेवकांच्या उपस्थितीत शुभारंभ..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-१४ :- नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ५ वाणी आळीमधील मुरलीधर मंदिर ते राऊतआळी गणपती मंदिर पर्यंतचा रस्त्याचे काम मार्गी लागल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.यावेळी महाविकास आघाडीतील काँग्रेसचे गटनेते व उपनगराध्यक्ष सुधीरशेठ शिंदे,बांधकाम सभापती मनोज शिंदे,आरोग्य सभापती शशिकांत मोदी,स्थानिक नगरसेविका शिवानी पवार,नगरसेवक कबीर काद्री,नगरसेविका जयश्री चितळे,रश्मी गोखले आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याधिकारी यांनी आहे त्या स्थितीत काम करण्याचे जे आश्वासन दिले होते त्यानुसार आणि पावसापूर्वी सदरचे काम होणे खूप गरजेचे असताना सोनाली कन्स्ट्रक्शन कंपनीने देखील ह्या कामाला सुरुवात केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.तसेच स्थानिक नगरसवेक बिलाल पालकर ,शिवानी पवार ,महाविकास आघाडी ,नगराध्यक्षा व स्थानिक नागरिक यांच्या प्रयत्नाने सदरचा रस्ता मार्गी लागला आहे.
खराब अवस्थेतील या रस्त्याची गेली तीन ते चार वर्षापासून खूप चाळण झाल्याने नागरिक आणि इतर भागातील रहिवाशांना त्रास होत होता . पवार आळी , दादर मोहल्ला , मिठागरी मोहल्ला , मुरादपूर , रेल्वे स्टेशन , महाराष्ट्र हायस्कूल व महाविद्यालय इत्यादी भागामध्ये जाण्यासाठी मुख्य रहदारीचा हा रस्ता डांबरीकरण सुरुवात झाल्याने गैरसोय दूर होणार आहे. या कामासाठी पंकज कोळवणकर,माजी नगरसेवक संजय रेडीज,सचिन शेट्ये,सुमित गुढेकर,धीरज खेडेकर,मंगेश शेट्ये,निलेश खातू,अमोल टाकळे,योगेश कोलगे आदींनी प्रयत्न केले होते.

