आणखीकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾इन्सुलीतील कालव्याचे काम प्रगती पथावर ; उपसरपंच रामचंद्र चराटकर

 

◾पोट कालव्याचे काम बंद करायचेच असल्यास शेतकरी आणि ग्रामस्थ मिळुन तुम्ही लेखी स्वरूपात सह्यांचा अर्ज करावा ; मी गावासोबतच असेन..

◾पोट कालव्याचे काम थांबवल्यामुळे ९१६ एकर क्षेत्र ओलिताखाली व पिकाऊ होणार ते बंद होण्याची भिती आहे ; भविष्यात ‌होणारे हे मोठे नुकसान काही लोकांना ज्ञात नाही

◾पोटकालव्यामुळे कोणतेही नुकसान होणार नसुन भविष्यात याचा शेती-फळबागेसाठी चांगला उपयोग होऊ शकतो ; सदस्या वर्षा सावंत ‌हे तुम्ही उमजून घ्यायला हवं..

◾स्वस्तिक कन्स्ट्रक्शनकडे मागील वर्षी जे.सी.बी कोणाचा ‌होता ? या वर्षी काम मिळाले नाही म्हणून स्वस्तिक कन्स्ट्रक्शन उपसरपंचांचं झालं काय ?

◾कालव्याला पाणीच नाही मग ते उपसरपंचांकडे कस मुरतंय ते वर्षा सावंत यांनी स्पष्ट करावे..

◾सदरचे काम वार्ड क्रमांक २ मध्ये नसुन वार्ड क्रमांक ४ मध्ये आहे ; सौ‌ सावंत यांनी आपल्या वार्डची चर्तु:सिमा ज्ञात करुन घ्यावी.. तसेच सावंत यांनी माझी टोपण नावाने जाहिरातबाजी न करता संपूर्ण नावाने जाहिरात करावी तसे‌ केल्यास ते कायद्यात असंविधानिक आहे‌ ; ज्यांच्यावर आपण आरोप करतो ती व्यक्ती कोण आहे हे‌ प्रथम समजुन घ्यावे..

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि-१३ :- इन्सुली कालव्याला पाणी येण्यासाठी आमदार श्री.दिपक केसरकर यांनी शब्द दिला असता मी‌ स्वतः ओटवणे गावच्या हद्दीतील तिलारी कालव्याच्या तिसाव्या किलोमीटर अंतरामधील अपूर्ण असलेल्या कामाची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी व पाठपुरावा केला असताना असे दिसून येत आहे ‌की कॅनलचे काम प्रगती पथावर व लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे वाटचाल चालू आहे,सध्या कालव्याचे पाणी ओटवणे गावच्या हद्दीपर्यंत आणलेले आहे तरी ते लवकरात लवकर कमी कालावधीत राहिलेले काम पुर्ण होताच इन्सुली गावच्या हद्दीत पाणी येईल अशी संबंधित विभागाने ग्वाही दिली आहे.

पाईप लाईनचे काम बंद पाडणाऱ्या काही ग्रामस्थांना माझी विनंती आहे की, त्यांनी ग्रामपंचायतीकडे लेखी स्वरूपात स्वतः व शेतकऱ्यांच्या सहीचा पाणी येईपर्यंत काम बंद चा मागणी अर्ज करावा म्हणजे मी आपला गावचा उपसरपंच या नात्याने सदर पाणी व कामाचा पाठपुरावा अधिक जोमाने व संविधानिक रित्या करु शकेन.

सरपंचांवरती काहींनी दबाव निर्माण करुन काम बंद करण्याचे पत्र द्यावयास सांगितले सरपंचांनी माणुसकी जपुन व ग्रामस्थांचा आदर राखून कोणताही लिखित अर्ज नसताना भावनिक दृष्ट्या काम बंद करण्याचे पत्र दिले.त्याच्या त्याच पत्राचा आधार घेऊन काही मोजके ग्रामस्थ भांडवल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.या पत्राचे उत्तर संबंधितांनी पत्राने दिले‌ असता असे दिसून आले की आपणास जर सिंचनासाठी कालव्याचे पाणी नको असल्यास अथवा बंदिस्त पाईपलाईन नको असल्यास त्यांनी तसा ग्रामपंचायतीला संयुक्त सहीचा ठराव देणे गरजेचे आहे,असा जर ठराव दिला तर ९१६ एकर क्षेत्र हे ओलिताखाली व पिकाऊ होणार ते कायमचे बंद होऊ शकते त्यासाठी पर्याय म्हणून ग्रामस्थांच्या सही अर्जाची आवश्यकता आहे, भविष्यात ‌होणारे हे मोठे नुकसान आपल्या गावचे आहे, काही लोकांना ज्ञात नाही आपला गाव जर सुजलाम-सुफलाम करावयाचा असेल तर सदरचे काम विहित वेळेत होणे गरजेचे आहे.

वर्षा सावंत यांनी हे समजून घ्यायला हवे की,सदरचे काम हे पोट कालव्याचे नसुन बंदिस्त पाईप लाईनचे आहे, यामुळे शेतकऱ्यांचे‌ नुकसान न‌ होता त्यांच्या प्रत्यक्ष शेतात पाणी येणार आहे व त्यामुळे कोणतेही नुकसान होणार नसुन भविष्यात याचा चांगला शेतीसाठी, फळबागेसाठी होऊ शकतो.

ज्या मुख्य कालव्याला पाणीच नाही व पाईप लाईनचे काम अर्धवट असताना उपसरपंचाच्या घरी पाणी कसे मुरते ते स्पष्ट करावे.गेल्या वर्षी स्वस्तिक कन्स्ट्रक्शनकडे जे.सी.बी कोणाचा होता ? या वर्षी काम मिळाले नाही म्हणून त्याचा राग मनात धरून हे कन्स्ट्रक्शन तुम्ही उपसरपंचांचं म्हणता काय

वर्षा सावंत यांना मी आदरपूर्वक सांगु इच्छितो की, सदरचे काम वार्ड क्रमांक २ मध्ये नसुन ते वार्ड ‌क्रमांक ४ मध्ये चालू ‌आहे,तरी त्यांनी आपल्या वार्डची चर्तुसिमा ज्ञात करुन घ्यावी व नंतरच आरोप करावेत, त्यांना ‌मी पुन्हा सांगु इच्छितो की, कोणत्याही व्यक्तीच्या टोपण नावाने त्याची जाहिरातबाजी करु नये तसे केल्यास ते कायद्यात असंविधानिक आहे.उपसरपंच काका चराटकर नसुन श्री.रामचंद्र विष्णु चराटकर हे आहेत हे‌ त्यांनी ज्ञात करुन घ्यावे, स्वतः च्या प्रसिध्दीसाठी आपण ज्यांच्यावर आरोप करतो ती व्यक्ती काय आहे ‌हे प्रथम समजुन घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!