आणखीकोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

◾खाबाळे गावचे सुपुत्र यशवंत सेना संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष, धनगर समाजाचे कोकण नेते राजू बोडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

 

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

 ✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

‌🎴वैभववाडी,दि-११ :- वैभववाडी तालुक्यातील खाबाळे गावचे सुपुत्र यशवंत सेना संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष धनगर समाजाचे कोकण नेते राजू बोडेकर वय वर्षे ५४ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ठाणे येथील राहत्या घरी निधन झाले

राजू बोडेकर हे नोकरीनिमित्त मुंबई ठाणे येथे वास्तव्यास होते ते ठाणे जनता सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते त्याच बरोबर तेमुंबई ठाणे किंवा कोकणापासून उर्ववरीत कोणत्याही विभागातील मोठ्या सामाजिक कार्यक्रमांत प्रमुख सहभाग नेहमीच असावयाचा.

वैभववाडी तालुका धनगर समाज सेवा संस्था या संस्थेच्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते. ती जबाबदारी पेलत विद्यार्थ्यांचे शिक्षण, तरुणांना रोजगार व्यवसाय आणि धनगर वाड्यावस्त्यावरील सोयीसुविधा या कामांतुन आपल्या कार्याचा जणमानसात ठसा उमटवला. वाड्यावस्त्यांवरील विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्य वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षिस देवून यथोचित सत्कार करणे या उपक्रमातून तरुण वर्गास मार्गदर्शन व दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले.

कोकण विभागातील धनगर जमातीचे जीवनमान उंचावण्यासाठी समाजाच्या विविध विषयांवरील आंदोलनात तन-मन-धनाने सहभागी होत संबंधित आंदोलनाचे नेतृत्व करत. स्वर्गीय बी. के. कोकरे यांनी पेरलेली जणजागृतीची मशाल मा. सरसेनापती माधवभाऊ गडदे यांचे नेतृत्वात धनगर जमातीच्या आरक्षण आणि सामाजिक, राजकिय, आर्थिक, धार्मिक आणि शैक्षणिक बाबींवर कार्य करणार्‍या “यशवंत सेनेची” कोकण विभागाच्या अध्यक्षपदाची धुरा आक्रमकपणे सांभाळत होते.त्याच्या पश्चात वडिल, पत्नी, विवाह दोन मुलगे भाऊ भावजय असा मोठा परिवार आहे.धनगर समाज नेत्या सामाजिक कार्यकर्ते शुभांगीताई शिंदे यांचे ते भाऊ होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!