◾खेर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते यांच्या अग्निशमन केंद्राच्या मागणीला लवकरच यश..
◾महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यवाहीचे आदेश..
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴 चिपळूण,दि-११ :- शहरालगतच्या खेर्डी हे उपशहर म्हणून ओळखले जाते . शहरालगतचा खेर्डी परिसर झपाट्याने वाढत असून येथे वीस हजार लोकसंख्या आहे .औद्योगिक वसाहतीलगत मोठी वस्ती असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे अग्निशमन केंद्र उभारण्याची मागणी खासदार विनायक राऊत यांच्याकडे युवासेना तालुका अधिकारी उमेश खताते यांनी केली आहे.तसेच त्यांच्या माध्यमातुन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे देखील सतत पाठपुरावा केला होता.त्यांनी लवकरच येथे अग्निशमन केंद्र उभारण्यात येईल ,असे आश्वासन दिले आहे.
आतापर्यंत खेर्डी औद्योगिक वसाहतीत अनेकदा आग लागली आहे .मात्र येथे अग्निशमन स्वतंत्र यंत्रणाच नसल्याने आग लागल्यास नगर परिषद , लोटे वसाहतीसह अन्य अग्निशमन बंबांवर अवलंबून राहावे लागते . अग्निशमन बंब वेळेत उपलब्ध होत नसल्याने उद्योग व व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने या औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र अग्निशमन केंद्र अत्यंत गरजेचे आहे . याचपार्श्वभूमीवर युवासेना तालुका आधिकारी खताते यांनी प्रशासन स्तरावर देखील सातत्याने पाठपुरावा केला आहे. खासदार राऊत यांनी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाशी तत्काळ चर्चा करत लवकरात लवकर सदर जागेची पाहिणी करुन योग्य ती कागदत्राची पूर्तता केली जाईल , असे स्पष्ट केले.
यबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून कार्यवाहीचे आदेश प्राप्त झाल्याने याठिकाणी अग्निशमन केंद्राची उभारणी होण्याच्या खतातेंच्या प्रयत्नास यश मिळणार असल्याचे दिसून येत आहे.याबाबत त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

