कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

◾ कसाल बाजारपेठेत विकेंड लॉकडाऊनला उस्फुर्त प्रतिसाद..

 

🖥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज

✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴कसाल,दि-१० :- सध्या महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशभर पुन्हा एकदा कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या विकेंंड लॉकडाऊनला कसाल मध्ये व्यापारी व नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत संपूर्ण बाजारपेठेसह कसाल शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरोना चा वाढता प्रादुर्भाव व जाहिर झालेले लॉकडाऊन यामुळे कसाल मध्ये सर्वत्र शांतता होती. अत्यावश्यक मेडिकल व दवाखाने या सेवा वगळता सर्व शांतता होती. कसाल बस स्थानकात विकेड लोकडाऊनमुळे एसटी बस येत नव्हत्या .प्रवासीही बस स्थानकात नव्हते त्यामुळे कसाल बस स्थानकात शुकशुकाट होता. कसाल ग्रामपंचायत व स्थानिक ग्रामनियंत्रण समितीच्या वतीने कसाल उपसरपंच दत्ताराम सावंत यांनी लॉकडाउन डाऊन पार्श्वभूमीवर व्यापारी व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. सर्वांच्या सहकार्यामुळे प्रशासनावरील बंदोबस्ताचा भार कमी दिसत होता. कसाल मध्ये सर्वत्र शुकशुकाट असल्याचे चित्र शनिवारी सर्वत्र दिसत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!