◾व्यापाऱ्यांनी ८ दिवस शासनाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन केल्यास शासनाकडून दिलासा देण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले जातील ; उदय सामंत
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-०६ :- रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आज उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची आज भेट घेतली. यावेळी व्यापाऱ्यांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या.
मागील लॉकडाऊनमध्ये व्यापारी देशोधडीला लागला असून आता करण्यात आलेला नियमांमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. आता तोटा सहन करण्याची आमची क्षमता संपली असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आपल्या व्यापाऱ्यांचे म्हणणे मुख्य साचीवांसमोर आणि मंत्रिमंडळ बैठकीत मांडतो. आपण व्यापाऱ्यांनी येत्या आठ दिवसात शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा यामुळे यातून काहीतरी सकारात्मक मार्ग काढता येईल असे वाचन ना. उदय सामंत यांनी दिले आहे.
ना. उदय सामंत यांच्या विनंतीला मान राखून आठ दिवस व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले आहे.

