कणकवली शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त…
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴 कणकवली : दि. ०६ शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असून डी.वाय.एस.पी डॉ. नितीन कटेकर, पोलीस निरीक्षक मुल्ला, पीएसआय अनमोल रावराणे, बापू खरात सहकारी स्थानिक पोलीस आणि दंगा काबू पथकच्या कर्मचाऱ्यांसह बाजारपेठ आणि शहरात फिरून नागरिक आणि व्यापाऱ्यांना कोव्हीड चे नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत.
आज कणकवलीचा आठवडा बाजार दिवस असल्यामुळे दशक्रोशीतून नागरिक खरेदीसाठी कणकवलीत आले होते. मात्र वाढत्या कोव्हीड प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आठवडी बाजार बंद ठेवत असल्याची घोषणा नगराध्यक नलावडे यांनी केली होती. तरीही आज सकाळी बाजारात गर्दी उसळली होती. पोलीस, नगरपंचायत प्रशासनाने बाजारात फिरून व्यापारी आणि नागरिकांना आवाहन केल्यानंतर शहराबाहेरून आलेल्या भाजीविक्रेत्यांनी आपली दुकाने बंद केली.

