आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

कुडाळ – मालवण मतदार संघांचे आमदार वैभव नाईक वाढदिवस साजरा करताना कोरोना नियमांना विसरले – दया मेस्त्री

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. ५ कुडाळ – मालवण मतदार संघांचे आमदार वैभव नाईक यांनी आपला वाढदिवस साजरा करताना कोरोना नियमांना विसरले आहेत. कोरोना प्रतिबंधक आवश्यक उपाय अवलंबिन्यात आले नाहीत. कार्यकर्त्यांच्या दाटीवाटीत वाढदिवस साजरा करताना आपल्याच पक्षाच्या पक्षप्रमुख मुख्यमंत्री यांचे आदेश पायदळी तुडविले आहेत. खरंच आहे यात आमदार वैभव नाईक यांची चुक नसुन आदेशावर चालणाऱ्या शिवसेनेत आता आदेश पाळणे हे दुरापास्त झालेले आहे.

या उलट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मात्र राजसाहेबांच्या आदेश येताच जीवाची बाजी लावणारे महाराष्ट्र सैनिक कार्यरत असताना दिसत आहेत. कोरोना या जीवघेण्या साथीने देशात पुनःश्च थैमान घातलेले आहे. त्याची झळ महाराष्ट्रसह सिंधुदुर्ग मध्ये लागली आहे. कोरोना बाबत जनतेने जागृत राहुन कोरोना प्रतिबंधक उपाय काटेकोरपणे अमलात आणण्याचे आदेश प्रशासनासह जनतेला दिलेले असताना. प्रसंगी दंडात्मक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला आहेत.

मात्र वाढदिवसापोटी या कोरोना निर्बंधाना न पाळता पक्षप्रमुखांच्या आदेशांना आमदार वैभव नाईक सोईस्कररित्या विसरतात. यावरून पक्षासह पक्षप्रमुखांन वरील निष्ठा कशाप्रकारे आहे हे ठळक पणे दिसुन येत. कुडाळमध्ये वाढदिवस साजरा करताना दाटीवाटीन उभे राहुन केलेली गर्दी पाहता, कोरोना प्रादुर्भाव होऊ नये. याची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक असताना एका लोकप्रतिनिधी कडुन बेजबाबदारपणाचा कळस झालेला आहे. याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. कुडाळमध्ये वाढदिवसाच्या भाऊंगर्दीत उपस्थित असणाऱ्यां काहींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत.

अशाप्रकारे एका लोकप्रतिनिधीने जनतेच्या आरोग्याशी खेळणे हे निंदनीय आहे. याबाबत मनसेने पोलिसांना निवेदन देऊन गुन्हे दाखल करण्यास सांगितलं होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!