◾यशवंत गड येथे निस्वार्थीपणे गड संवर्धन करणाऱ्या जिल्ह्यातील शिवप्रेमींचा आम्हाला अभिमान ; मनसे वेंगुर्ला तालुका सचिव राजाराम (आबा) चिपकर
◾ स्थानिकांचा खोडसाळ विरोध झाल्यास शिवप्रेमींच्या पाठीशी मनसे उभी राहणार..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴रेडी,दि-०३ :- रेडी यशवंत गड येथे बुधवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यादरम्यान आरोंदा येथील एका शिवप्रेमींला माफी मागायला लावून यशवंत गडावर बाहेरील लोकांनी यापुढे येवू नये असे रेडी गावातील काही स्थानिकांनी सांगितल्याने शिरोडा सहित आरोंदा, कुडाळ येथील शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत.
यशवंत गडावर साफसफाई व संवर्धनाला येणारे सिंधुदुर्गातील शिवप्रेमी हे आपला बहुमूल्य वेळ खर्च करतात. त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडावरील कार्यक्रम हे देखील भव्यदिव्य रुपात शिवप्रेमी स्थानिकांना सोबत घेऊन साजरे करतात. त्यामध्ये राजकारण न करता शिवप्रेमी हे एकत्र येवून छत्रपती शिवरायांच्या प्रेमाखातर गड संवर्धनाचे कार्य प्रामाणिकपणे करीत आहेत. मग त्यास स्थानिकांचा विरोध का व कशासाठी ? असा प्रश्न रुपाली परब यांनी केला आहे. या घडलेल्या प्रकारामुळे शिरोडा, आरोंदा, कुडाळ, सावंतवाडी येथील शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत. सदर प्रकार हा निंदनीय असून त्यास आमचा तीव्र विरोध असून आम्ही जिल्ह्यातील शिवप्रेमींच्या सोबत असल्याचे मत मनसे वेंगुर्ला ता. अध्यक्ष सनी बागकर, सचिव राजाराम(आबा) चिपकर, कुडाळ ता.अध्यक्ष प्रसाद गावडे, सावंतवाडी शहर अध्यक्ष आशिष सुभेदार दोडामार्ग विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष अक्षय कुबल यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवरायांचे गड किल्ले हे शासनाच्या पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतात. त्या गड किल्यांच्या संवर्धनाच्या कार्यात कोणतेही राजकारण न करता, मेहनत घेणारे शिवप्रेमी सुमित राणे, सागर राणे, भूषण मांजरेकर, अभिषेक रेगे, वर्षा वडर, सेजल राऊत, पप्पू तेंडुलकर, संपदा राणे, सौरभ नागोळकर व इतर हे यशवंत गडाच्या साफसफाई व संवर्धनाच्या कार्याचा आम्हाला गर्व आहे. यशवंत गड संवर्धनाच्या कार्यात शिवप्रेमीवर स्थानिकांनी जाणीवपूर्वक खोडसाळपणे राजकारण करून विरोध करू नये, अन्यथा आम्ही त्यांच्या सोबत आहोत हे विसरू नये असे मत मनसेच्या वतीने वेंगुर्ला ता. सचिव राजाराम (आबा) चिपकर यांनी व्यक्त केले आहे.

