उत्तर प्रदेशमधील दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावरून उठलेले वादळ शमण्याची चिन्हे नाहीत..
पोलिसांनी ढकलले; डेरेक ओब्रायन पडले, महिला खासदारावरही लाठीमार
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह
🎴हाथरस,दि.०३: उत्तर प्रदेशमधील दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावरून उठलेले वादळ शमण्याची चिन्हे नाहीत. या मुलीच्या नातेवाइकांची भेट घेण्यासाठी हाथरसला निघालेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदारांना उत्तर प्रदेश पोलिसांनी वाटेतच रोखले. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीत या पक्षाचे खासदार डेरेक ओब्रायन खाली पडले. हाथरस प्रकरण पेटत असल्याचे लक्षात येताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिसांवर कारवाई सुरू केली आहे. हाथरसचे पोलीस अधीक्षक विक्रांत वीर आणि पोलीस उपअधीक्षक यांच्यासह एकूण पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे.
एसआयटी रिपोर्ट पाहिल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी ही कारवाई केल्याचे कळते. मुली आणि महिलांच्या सुरक्षेला सरकार सर्वोच्च प्राधान्य देईल आणि प्रत्येक बलात्काऱ्यास कडक शिक्षा व्हावी, हे पाहिले जाईल, असे ते म्हणाले.
हाथरसला निघालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, त्या पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी गुरुवारी अडविले व त्यानंतर ताब्यात घेतले होते. त्याचप्रमाणे शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनाही रोखण्यात आले.
या पक्षाच्या खासदार ममता ठाकूर यांनी असा आरोप केला की, हाथरसला आम्हाला जायचेच आहे, असा आग्रह कायम ठेवल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी माझा ब्लाउज फाडला तसेच तृणमूल काँग्रेसच्या आणखी एक खासदार प्रतिमा मंडल यांच्यावर लाठीमार केला. त्यामुळे त्या खाली पडल्या. यावेळी पोलिसांशी झालेल्या झटापटीत तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन हे जमिनीवर पडले.
दरम्यान या प्रकरणात पत्रकारांचीही अडवणूक करण्यात आली. दलित मुलीवर बलात्कार झाला, त्या गावी जाण्यापासून एबीपी न्यूज या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनाही उत्तर प्रदेश पोलिसांनी रोखले आहे. त्यांच्या कॅमेºयांची वायर काढून टाकण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला.
नवी दिल्ली बलरामपूरमध्ये मरण पावलेल्या दलित बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांनाही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पक्के घर, जमीन व एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली.
उमा भारती या प्रकरणावरून भाजप नेत्या उमा भारती यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. उमा भारती यांनी टिष्ट्वट केले आहे की, माझ्या माहितीनुसार असा कोणताही कायदा नाही की, ज्यानुसार एसआयटीचा तपास सुरू असताना पीडित परिवाराला कुणालाही भेटता येत नाही. अशाने एसआयटी तपासाबाबत संशय निर्माण होऊ शकतो. पोलिसांच्या या संशयास्पद कारवाईमुळे उत्तर प्रदेश सरकार आणि भाजपची प्रतिमा खराब झाली आहे.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील वाल्मीकी मंदिराला भेट दिली. हाथरसच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी आपण अखेरपर्यंत लढत राहू, असे आश्वासन त्यांनी तिथे जमलेल्या वाल्मीकी समाजाच्या लोकांना दिले. आमचा उत्तर प्रदेश सरकार व पोलिसांवर विश्वास नाही, अशी भावना लोकांनी बोलून दाखवली.
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IJOGnULTOy78rfR0Mo6Uk2
_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे *सुर्या गॅस*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

