सभापती रिया कांबळे यांच्या रूपाने आमच्या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला – संदेश मोहिते
◼️चिपळूण पंचायत समिती सभापती पदी रिया कांबळे यांच्या निवडीची रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांत उत्साह
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण : दि. ०१ महाविकास आघाडी च्या माध्यमातून वरिष्ठ सर्वच नेत्यानी आमच्या मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे , आज आमच्या भगिनी सौ.रियाताई राहुल कांबळे यांची चिपळूण च्या सभापती पदी निवड झाली आहे, ही आमच्या समाजासाठी अभिमानास्पद बाब आहे . महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आमदार भास्करराव जाधव,आमदार शेखरजी निकम,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, काँग्रेस चे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव आणि महाविकास आघाडीचे सर्वच वरिष्ठ मंडळी यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष तरुण बांधकाम व्यावसायिक एस.एम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे संदेश मोहिते यांनी चिपळूण पंचायत समिती येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
महाविकास आघाडी राज्यात तसेच चिपळूण मध्ये यशस्वीपणे काम करीत आहे आज सभापती निवडीमुळे नवनिर्वाचित सभापती रियाताई कांबळे यांच्या माध्यमातून चिपळूण तालुक्यात मागासवर्गीय वाड्या वस्ती,गावांमध्ये एक चांगला विकास करून घेता येईल आणि सभापती च्या वतीने नक्कीच विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल असे संदेश मोहिते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
चिपळूण तालुक्यातील नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती सौ. रिया राहुल कांबळे यांना रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष संदेश मोहिते आणि अडरे गावचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शशिकांत कवडे तसेच रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार रमेशभाई कदम,शिवसेनेचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम,शिवसेना शहर प्रमुख उमेश सकपाळ,शिवसेना तालुका प्रमुख प्रतापराव शिंदे,राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जयंद्रथ खाताते,प.स सदस्य अबुशेठ ठसाळे,दशरथ दाभोळकर यांचे संदेश मोहिते यांनी आभार मानले.

