कसाल येथे बॉक्सवेल बनलाय वाहतूक तळ
कसाल येथील बॉक्सवेल बनलाय वाहतूक तळ
प्रतिनिधी सुनील आचरेकर
कसाल एसटी स्टँड समोरील बॉक्स वेल सध्ये स्थितीत सुरक्षित वाहन म्हणून वापरला जात आहे. अन्य ठिकाणांहून येणाऱ्या व्यावसायिकांकडून यांच्या गाड्या या ठिकाणी पार्क केल्या जात आहेत. याचा त्रास या बॉक्सचा वापर करणाऱ्या वाहनचालकांना होत आहे. वळण घेताना जागा अपुरी पडत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या ठिकाणाहून होणारी वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलिस प्रशासनाने लक्ष घालावे वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. शिवाय या ठिकाणी वाहने उभी केल्यामुळे दोन्ही सर्व्हिस रोडवर बाजूस वाहतूक कोंडी होते मुंबई-गोवा महामार्गावर कसाल एसटी स्टँड समोरील बॉक्सवेल चा वापर कणकवलीहून कसालकडे एसटी स्टॅंडवर येणाऱ्या व मालवण कडे जाणाऱ्या वाहनचालकांकडून केला जातो .मात्र कसाल बाजारपेठ व्यवसाय करण्यासाठी येणाऱ्या कोल्हापूर बेळगाव अन्य काही ठिकाणच्या व्यवसायकडून त्यांची मालकीची वाहने या ठिकाणी पार्किंग केली जातात. पार्क केलेल्या गाड्यांमुळे वाहतूक कोंडीचे समस्येला सामोरे जावे लागत आहे .पोलिसांनी याकडे लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

