◾तरुण उद्योजक रोहन नलावडे यांचा असाही प्रामाणिकपणा..
◾त्यांना सापडली १० हजारांची रक्कम ; ज्याची असेल त्यानी ती ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴चिपळूण,दि-२९ :- शहरातील बहादूरशेख येथे राहणारे तरुण उद्योजक रोहन नलावडे हे काल खेर्डी एमआयडीसी परिसरात कामानिमित्त गेले असताना त्यांना साधारणतः १० हजार रुपयांची रक्कम मिळाली आहे.शिमगा सणाच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम आढळून आली आहे.तरी ज्यांची कुणाची ही रक्कम असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जावे असे आवाहन रोहन नलावडे संपर्क क्रमांक 8600808012 यांनी केले आहे.
रोहन नलावडे यांच्या या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.अशा प्रकारची प्रामाणिक वृत्ती आढळणे सध्या दुरापस्त झाली आहे.

