◾कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करून घेणे गरजेचे ; अँड परिमल नाईक
◾सावंतवाडी शहरात प्रभाग क्रमांक ८ मध्ये केली जनजागृती व लस घेण्याबाबत प्रबोधन..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी दि.२७-: सद्य स्थितीत देशात प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत असून, जिल्ह्यात देखील रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी लसीकरण करून घेणे आवश्यक असून, प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन सावंतवाडी नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती तथा नगरसेवक अँड परिमल नाईक यांनी केले आहे.
लसीकरणाबाबत लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी त्यांनी स्वतः सावंतवाडी शहरात प्रभाग क्रमांक ८ मध्ये जनजागृती केली असून, लस घेण्याबाबत प्रबोधन केले आहे.
शिमगोत्सवात सुरक्षे संदर्भातील सर्व नियम काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच व्यापारी व व्यवसायिकांचा येथे काम करणाऱ्या कामगारांना कोविड तपासणी संदर्भात जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशांचे त्यानी स्वागत केले आहे.

