आणखीकरियरकोकणरत्नागिरी

मुक्ता रेडीज – साडविलकर हिचे एम. डी. आयुर्वेद परीक्षेत स्पृहणीय यश…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संतोष पिलके

 🎴चिपळूण : दि. २७ बाजारपेठेतील प्रतिथयश व्यापारी कैलासशेठ रेडीज यांची सुकन्या तसेच चिपळूण अर्बन बँकेचे निवृत्त अधिकारी व विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांवर कार्यरत असणारे नयन साडविलकर यांची सून मुक्ता हिने नुकत्याच यशवंत आयुर्वेद महाविद्यालय कोडोली कोल्हापूर येथून एम.डी.आयुर्वेद या परीक्षेत स्पृहणीय यश संपादन केलेले असून वनस्पती शास्त्र या विषयात स्पेशलायझेशन केले आहे.

मुक्ताचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण एस.पी.एम. इंग्लिश मीडियम स्कूल, परशुराम येथून झाले असून उच्च माध्यमिक शिक्षण तिने डी. बी. जे. महाविद्यालयातून घेतलेले आहे, त्यानंतर पोद्दार आयुर्वेद महाविद्यालय वरळी, मुंबई येथून तिने बी. ए. एम. एस. ही पदवी मिळवली आहे.
यापूर्वी मुक्ताने कोवँस व्यायाम मंदिर या संस्थेच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून अनेक स्पर्धांमध्ये मानाची पारितोषिके मिळवली आहेत, तसेच अनेक योगपटूना भारतात तसेच परदेशात योगासनांची प्रशिक्षक म्हणूनही मार्गदर्शन केलेले आहे.

मुक्ताने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल रेडीज आणि साडविलकर परिवारा बरोबरच वैश्य समाजबांधव तसेच अनेक मान्यवरांकडून मुक्ताचे तसेच तिचे पती नितीष साडविलकर यांचे अभिनंदन केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!