आणखीकणकवलीकरियरकोकणसिंधुदुर्ग

कणकवली महाविद्यालयाच्या कलावंत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कला प्रकारांमध्ये यश संपादन केले

🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २७ मुंबई विद्यापीठ, मुंबई आयोजित ५३ व्या आंतर – महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवामध्ये कणकवली महाविद्यालयाच्या कलावंत विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कला प्रकारांमध्ये यश संपादन केले आहे.

मुंबई विद्यापीठाने प्रतिवर्षाप्रमाणे कोविडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी ५३ व्या आंतर – महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने केले होते. यामध्ये वैयक्तिक कला प्रकारांचा अंतर्भाव करून हा महोत्सव घेण्यात आला. दिनांक 20 मार्च ते 25 मार्च 2021 दरम्यान प्राथमिक फेरीतील विविध कला प्रकारांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये कणकवली महाविद्यालयातील कलावंत विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांमध्ये यश संपादन केले.

यात कु. पल्लवी योगेश करंबेळकर ( एस वाय बी एस्सी ) – भारतीय सुगम संगीत, कु. रिद्धी अमोल मोरवेकर ( एफ वाय बी एस्सी ) – नक्कल ( मिमिक्री ), अमेय रामचंद्र हिर्लेकर ( एस वाय बी ए ) आणि कु. मृणाल मिलिंद गावकर ( एफ वाय बी ए ) – कथाकथन हे विध्यार्थी मुंबई विद्यापीठ पातळीवर होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पोहचले असून यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाईसाहेब खोत, चेअरमन सुरेश कामत, सचिव विजयकुमार वळंजू व संस्था पदाधिकारी तसेच महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्रकुमार चौगुले, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. युवराज महालिंगे, प्रा. हरिभाऊ भिसे, प्रा. डॉ. एल.आय. घोरपडे, प्रा. डी.सी. पाटकर, प्रा. एस. पी. जाधव, प्रा. एस. आर. दर्प, प्रा. एस एस हडकर आणि प्रा. प्राची मिसाळ आदींनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!