Uncategorized

पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची केसरीतील ‘के एस आर एक्वारियम’ला सदिच्छा भेट!

पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची केसरीतील ‘के एस आर एक्वारियम’ला सदिच्छा भेट!

पर्यटन विकासासह रोजगारनिर्मितीच्या उपक्रमांचे केले कौतुक; संचालक विनोद राऊळ यांनी दिली प्रकल्पाची माहिती

सावंतवाडी, दि. ९ : सावंतवाडीचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम यांनी केसरी येथील के एस आर एक्वेरियम ला सदिच्छा भेट देत प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी के एस आर एक्वारियम चे संचालक तथा नेमळे गावचे माजी सरपंच विनोद राऊळ यांनी पोलीस निरीक्षक मगदूम यांचे स्वागत करून त्यांना संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक मगदूम यांनी एक्वारियम परिसरातील विविध आकर्षणे, उपक्रम तसेच पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी केली. केसरी परिसरातील पर्यटनाला चालना देतानाच स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणारा हा प्रकल्प असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
‘के एस आर एक्वारियम हे निसर्गरम्य परिसरात उभारलेले आकर्षक पर्यटनस्थळ असून, देशभरातून हजारो पर्यटक या ठिकाणी भेट देत असल्याने केसरी गावाची पर्यटन नकाशावरील ओळख अधिक ठळक झाली आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेकडो बेरोजगार युवक-युवतींना रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री, सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाने पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. निसर्ग, पर्यटन आणि रोजगारनिर्मिती यांचा सुरेख मेळ साधणाऱ्या या प्रकल्पामुळे केसरी गावाचे नाव व्यापक स्तरावर पोहोचले आहे.
भेटीदरम्यान परिसराच्या सर्वांगीण विकासासह पर्यटनवाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांबाबतही चर्चा करण्यात आली. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी भविष्यातील संधींबाबतही यावेळी विचारविनिमय झाला.
या सदिच्छा भेटी प्रसंगी भाजपचे युवा शहराध्यक्ष हितेन नाईक व
व पदाधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!