कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑रेलिंग ओलांडण्याची चूक ठरली जीवघेणी!

*🛑रेलिंग ओलांडण्याची चूक ठरली जीवघेणी!*

 

*🛑आंबोली महादेवगड पॉईंटवरून ४०० फूट दरीत कोसळलेल्या निपाणीच्या पर्यटकाचा मृतदेह अखेर बाहेर;सह्याद्री एडवेंचर रेस्क्यू ग्रुपच्या धाडसी मोहिमेला यश.*

 

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

 

*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

 

*🎴सावंतवाडी, दि- ०५:-* आंबोली येथील महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळलेल्या निपाणी (जि. बेळगाव) येथील पर्यटक डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी) यांचा मृतदेह बुधवारी दुपारच्या सुमारास सह्याद्री एडवेंचर रेस्क्यू ग्रुप, आंबोली-सांगलीच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर खोल दरीतून बाहेर काढला. मंगळवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

डॉ. आयुब सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसह वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे आले होते. मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास महादेवगड पॉईंट परिसरात असताना ते लघुशंकेसाठी सुरक्षेचे रेलिंग ओलांडून दरीच्या बाजूला गेले. यावेळी अचानक तोल गेल्याने ते थेट सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले.

घटनेच्या वेळी पॉईंटवर मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने हा अपघात प्रत्यक्ष पाहिला. त्याने तात्काळ डॉ. सय्यद यांच्या सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.

अपघात सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे २०० फूट पुढील जंगल परिसरात घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, अपघाताच्या ठिकाणी डॉ. सय्यद यांचा मोबाईल वरच राहिल्याने मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेणे शक्य झाले नाही. दरम्यान, अंधार पडल्यामुळे मंगळवारी सायंकाळी शोधमोहीम थांबविण्यात आली.

बुधवारी पहाटेपासून सह्याद्री एडवेंचर रेस्क्यू ग्रुपने पुन्हा शोधमोहीम सुरू केली. अत्यंत अवघड आणि धोकादायक दरीत दोरांच्या साहाय्याने शोधकार्य करण्यात आले. सकाळी सुमारे दहाच्या दरम्यान डॉ. सय्यद यांचा मृतदेह खोल दरीत आढळून आला. त्यानंतर अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात रेस्क्यू पथकाला यश आले.

या धाडसी रेस्क्यू मोहिमेत बाबल आल्मेडा, मायकल डिसोजा, संतान आल्मेडा, उत्तम नार्वेकर, लॉरेन्स आल्मेडा, राजू राऊळ, प्रथमेश गावडे, पासकु देसा, अजित नार्वेकर, समीर गावडे, आनंद गावडे, विशाल बांदेकर, प्रतीक मोहिते, नारायण चव्हाण, शुभम कळसुलकर, सर्वेश नाईक, मनीष नार्वेकर, वामन पालेकर, राकेश अमरुस्कर, दीपक मेस्त्री, अजित गावडे, रघुनाथ सावंत, अभिजित नार्वेकर आणि हेमंत नार्वेकर यांनी सहभाग घेतला.

या दुर्दैवी घटनेमुळे आंबोलीसारख्या पर्यटनस्थळी सुरक्षेचे नियम पाळण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले रेलिंग ओलांडणे किंवा धोकादायक ठिकाणी जाणे जीवावर बेतू शकते, याची जाणीव प्रत्येक पर्यटकाने ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासन आणि रेस्क्यू पथकाकडून करण्यात आले आहे.

*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J

——————————–

 

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡

🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠

🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

 

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

 

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,

☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

 

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

 

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

 

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

 

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

 

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

 

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

 

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

 

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

 

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

 

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

 

💫कमास ५०० ₹90,00,000

 

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

 

🏘️ घर / अपार्टमेंट

🏬 शाळा / कॉलेज

🏢 हॉटेल

🏭 कंपनी / ऑफीस

🏥 हॉस्पीटल

⛺ नर्सरी

सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

 

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

 

📱0888 999 8824

📱0777 592 1004

 

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️

________________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!